Saniya Mirza : भारताची टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झा आगामी टेनिस सीझनसाठी सज्ज
भारताची टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झा आगामी टेनिस सीझनसाठी सज्ज झालीय. साल 2022 च्या सुरूवातीला रंगणा-या ऑस्ट्रेलियन ओपनसाठी सानियाची तयारी लवकरत सुरू होणार आहे. मंगळवारी मुंबईच्या वांद्रे परिसरात 'डी बिअर्स' या हि-यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रँडच्या नव्या शोरूमच्या उद्धाटनासाठी सानिया उपस्थित होती. येत्या एक-दोन दिवसांत ती दुबईसाठी रवाना होऊन तिथच आपली महिला दुहेरीतील साथीदारासह सानिया सरावाला सुरूवात करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली वर्ष दिड वर्ष काहीसं संथ झालेलं क्रिडाविश्वही आता रूळावर आलंय. बायोबबल मधला सराव, स्पर्धा यातनं आता क्रिडाविश्वही हळूहळू सारवू लागलंय असं सानियानं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. तसेच घरात आईवडील दोघंही खेळाडू असल्यानं सतत ते आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी विविध स्पर्धांसाठी जगभरात फिरत असतात. त्यामुळे घरात मुलांकडे लक्ष देणं ही जबाबदारी कुटुंबातील अन्य व्यक्तींवर असते. सानिया आणि शोएब मलिकही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे घरच्यांचा खूप सपोर्ट असल्याचंही सानिया मान्य करते.
![Wankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीची](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/19/8ee68298ea19de5bfcb7773ee7288d3917372994892071000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Wankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवाद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/bf56742cc79dd5bcbd2b388abf1630c717372094204241000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Priyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/13/5fe16f3d782259fd45496281ef28aa4d1736765272539977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/05/674fa222642caabdd21865d7b0b3feaa1736098912030977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Khel Ratna Award 2024 : विश्वविजेता बुद्धीबळपटू D Gukesh and Manu Bhaker ला खेलरत्न पुरस्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/2564b9011bc1da338bd57740b1338865173581109723790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)