Shreyas Iyer चं कसोटी पदार्पणात शतक, कसोटी पदार्पणात शतक झळकवणारा सोळावा भारतीय फलंदाज
कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात कानपूरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने एक चांगली धावसंख्या उभारली आहे. भारतीय संघाकडून 345 धावांचा डोंगर उभारण्यात आला असून यामध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयसचं (Shreyas Iyer) शतक एक सर्वात विशेष आणि मोठी गोष्ट आहे. पण याच शतकामुळे संघातील एका खेळाडूचं टेन्शन मात्र वाढलं आहे. हा खेळाडू म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane). यामागील कारण म्हणजे मागील काही सामन्यांत खास कामगिरी करु न शकलेल्या रहाणेसाठी ही कसोटी म्हणजे जवळपास करो या मरो अशीच होती. ज्यात तो केवळ 35 धावा करु शकला, तर दुसरीकडे संघात त्याच्या स्थानावर अगदी परफेक्ट बसणाऱ्या श्रेयसने पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावलं आहे.























