एक्स्प्लोर
विंडीजचा अवघ्या 55 धावांत उडाला खुर्दा, आदिल रशीद, मोईन आणि मिल्सचा प्रभावी मारा
इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पहिला विजय साजरा केला. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी विंडीजचा डाव १५व्या षटकातच अवघ्या ५५ धावांत गुंडाळला. त्यामुळं इंग्लंडसमोर विजयासाठी केवळ ५६ धावांचंच लक्ष्य होतं. इंग्लंडनं केवळ चार विकेट्स गमावून नवव्या षटकात विजयासाठीचं लक्ष्य गाठलं. इंग्लंडच्या विजयात आदिल रशीद, मोईन अली आणि टिमल मिल्स यांनी प्रमुख भूमिका बजावली. आदिलनं चार, मोईननं दोन आणि मिल्सनं दोन विकेट्स घेऊन विंडीजच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















