एक्स्प्लोर
IND Vs WI 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 44 धावांनी विजयी, मालिकेतही विजयी आघाडी
IND Vs WI, 2nd ODI : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात (Narendra Modi Stadium) पार पडलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND Vs WI 2nd ODI) भारताने 44 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही भारताने दोन सामने जिंकत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. सामन्यात भारतानं 50 षटकात 9 विकेट्स गमावून वेस्ट इंडीजच्या संघासमोर 238 धावांचं लक्ष्य ठेवलं ज्यानंतर वेस्ट इंडिजला 193 धावांत सर्वबाद करत भारताने 44 धावांनी सामना जिंकला.
आणखी पाहा























