IND vs NZ 2nd Test : भारतीय गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचा डाव ढेपाळला : ABP MAJHA
वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघानं मजबूत पकड मिळवली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाकडे 332 धावांची आघाडी होती. एजाजच्या भेदक फिरकी माऱ्यापुढे भारतीय संघाचा पहिला डाव 325 धावांत संपुष्टात आला होता. भारतीय गोलंदाजांनीही न्यूझीलंडला जशासतसं प्रत्युत्तर दिलं. भारतीय गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचा डाव ढेपाळला. सिराज-अश्विन यांच्या भेदक माऱ्याला अक्षर पटेलची चांगली साथ मिळाली. न्यूझीलंडचा डाव अवघ्या 62 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंड संघाला फक्त 62 धावांवर गारद केल्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघाकडे 263 धावांची विशाल आघाडी होती. भारतीय संघानं फॉलऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामी फलंदाज गिल दुखापतग्रस्त असल्यामुळे चेतेश्वर पुजारानं मयांक अग्रवाल याच्यासोबत डावाची सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाचा डाव संपला तेव्हा भारतीय संघानं बिनबाद 69 धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडे तब्बल 332 धावांची आघाडी झाली आहे. दुसऱ्या दिवसा अखेर सलामी फलंदाज मयांक अग्रवाल 38 तर चेतेश्वर पुजारा 29 धावांवर नाबाद आहेत.