Hardik Pandya च्या अडचणीत वाढ; भारतात परतताच मुंबई विमानतळावर पंड्याकडून 5 कोटींची दोन घड्याळं जप्त
टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघातून हार्दिक पंड्याला बाहेरचा रस्ता मिळालाय. खराब फॉर्मशी झगडत असताना वैयक्तिक आयुष्यात हार्दिक पंड्याच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. यूएईवरुन भारतात परतताच मुंबई विमानतळावरुन हार्दिक पंड्याकडून ५ कोटींची दोन घड्याळं जप्त करण्यात आलीय. कस्टम विभागाने ही कारवाई केलीय. हार्दिककडे या घड्याळांची बिलं नव्हती. तसंच त्यानं या घड्याळांची कुठलीही माहिती दिली नव्हती. त्यामुळे कस्टम विभागाने ही घड्याळं जप्त केलीत. गेल्या वर्षी हार्दिकचा भाऊ क्रुणाल पंड्यावरही अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यानेही महागड्या वस्तूंची माहिती कस्टम विभागाला दिली नव्हती.. त्यामुळे त्याच्याकडून त्या वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या...






















