एक्स्प्लोर
Amol Mazumdar : अमोल मुझुमदार यांची भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
मुंबईचे माजी कर्णधार अमोल मुझुमदार यांची भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा आज बीसीसीआयकडून करण्यात आली. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली होती. अमोल मुझुमदार यांच्या गाठीशी तब्बल २१ वर्षांच्या कारकीर्दीचा अनुभव आहे. या कालावधीत त्यांनी प्रथम दर्जाच्या १७१ सामन्यांमध्ये ३० शतकांसह ११ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. मुंबईच्या अनेक रणजी करंडक विजेत्या संघांमध्ये अमोल मुझुमदार यांचा समावेश होता. त्यांनी एक व्यावसायिक खेळाडू म्हणून आसाम आणि आंध्र प्रदेशचंही रणजीत प्रतिनिधित्व केलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















