Yavatmal APMC Elections : पुसद बाजार समितीत सर्व 18 जागांवर राष्ट्रवादीचा विजय
Yavatmal APMC Elections : पुसद बाजार समितीत सर्व 18 जागांवर राष्ट्रवादीचा विजय
पुसद कृषी उत्पन्न बाजार समिती वर माजी मंत्री मनोहर राव नाईक व आमदार इंद्रनिल नाईक यांचे वर्चस्व. आज झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये माजी मंत्री मनोहर नाईक पॅनलचे सर्व 18 जागी उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत युवा आमदार श् इंद्रनिल नाईक यांच्या नेतृत्वामध्ये भाजप प्रणित आघाडीचा सुपडा साफ झाला. माजीमंत्री मनोहर नाईक यांनी बंगल्यावर बसून व आमदार इंद्रनिल नाईक यांनी पुसद तालुक्यातील सर्व सोसायटी व ग्रामपंचायत व्यापारी हमाल गटाला योग्य मार्गदर्शन केले. सर्व जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले.























