Russia Ukriane War: सुमी शहरातून 700 विद्यार्थ्यांची सुटका ABP Majha
युक्रेनच्या पूर्व भागातील खारकिव्ह, पिशोचिन आणि सुमी शहरात अडकलेल्या भारतीयांना अखेर दोन आठवड्यांनंतर तिथून बाहेर काढण्यात आलंय. मी शहरात जवळपास ७०० विद्यार्थी अडकलेले होते. मात्र रशियानं तात्पुरता युद्धविराम दिल्यानं भारतीय दूतावासाचं पथक सुमीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी पोहोचलं. तिथून विशेष बसेसमधून या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या पोलटाव्हा शहरात आणण्यात आलंय इथून विशेष ट्रेन्सद्वारे हे विद्यार्थी आता युक्रेनच्या पश्चिम सीमेकडे रवाना झाले आहेत. दरम्यान सुमी शहरावर रशियाकडून जोरदार एअर स्ट्राईक सुरू जालाय आणि त्यात सुमी शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. रशियानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यात घरं, वाहनं, रस्त्यांचं मोठं नुकसान झालंय.























