Indian Army Missile : पंतप्रधान मोदी यांच्या मुत्सद्देगिरीची चुणूक, पाकिस्तानला मिळाला धडा
आता बातमी पंतप्रधान मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीची.. पाकिस्तानातील तत्कालीन भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अँगर मॅनेजमेंट या पुस्तकातून मोंदीची ही मुसद्देगिरी अधोरेखित होते.. अजय बिसारिया २०१९ ची भारत पाकिस्तानमधली परिस्थिती वर्णन करताना आपल्या पुस्तकात असं म्हणतात की, २०१९ च्या फेब्रुवारीत पंतप्रधान मोदींच्या कूटनितीने पाकिस्तानला घाम फोडला होता. भारतीय लष्कराने तब्बल नऊ क्षेपणास्त्रे पाकिस्तानवर सोडण्याची तयारी केली होती. भारताची ही युद्धसज्जता पाहून तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला, पण मोदींनी हा फोन स्वीकारला नाही. त्यापूर्वी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्या घरीही पाकिस्तानी अधिकारी पोहोचले होते. ही रात्र होती २७ फेब्रुवारी २०१९ ची..हा तोच दिवस आहे जेव्हा भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात होते..