एक्स्प्लोर
Coronavirus | 'कोणतीही चूक करू नका, कोरोना आपल्यासोबत बराच काळ राहणार'; WHOचा इशारा
कोरोना व्हायरसने जगभरात हैदोस घातला आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) संपूर्ण जगाला कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर एक इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने सांगितलं आहे की, कोणतीही चूक करू नका, हा व्हायरस आपल्यासोबत बराच काळ राहणार आहे. यासंदर्भात बोलताना डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस म्हणाले की, 'अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या महामारीची आताच सुरुवात झाली आहे. ज्या चीनमध्ये या व्हायरसने जन्म घेतला तिथे पुन्हा या व्हायरसचा संसर्ग झालेले रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोणतीही चूक करू नका, हा व्हायरस आपल्यासोबत बराच काळ राहणार आहे.'
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























