एक्स्प्लोर
Coronavirus | कोरोना जगात 2021च्या जून-जुलैपर्यंत कायम राहणार : पेंटागॉन
अमेरिकेतून कोरोनासंदर्भात चिंतेत भर टाकणारी बातमी... अमेरिकेची सुरक्षा संस्था पेंटागनमधून लीक झालेल्या दस्तावेजांमध्ये कोरोना पुढील वर्षीच्या जून-जुलैपर्यंत जगभरात टिकून असेल असा खुलासा करण्यात आलेला आहे. आणखी एक चिंतेची बाब म्हणजे पुढील वर्षीच्या जून-जुलै महिन्यापर्यंत कोरोनावर कुठलीही लसही उपलब्ध नसेल. शिवाय, या दस्तावेजांमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये कोरोनाचा कहर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीए. पुढे याच दस्तावेजांमध्ये कोरोना चाचणीसंदर्भात मोठी गोष्ट आढळली आहे. त्यानुसार चाचणीअंती तुम्हाला कोरोना नाही याची शंभर टक्के खात्री होऊच शकत नाही, असाही खळबळजनक गौप्यस्फोट लीक झालेल्या दस्तावेजांमध्ये केलेला दिसतोय.
आणखी पाहा























