Donald Trump Arrest : अमिरेकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक
Donald Trump Arrest : अमिरेकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक
न्यूयार्क: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कमधील मैनहैटन कोर्टात हजर झालेत. कोर्टात हजर होताच ट्रम्प यांना पोलीसांनी अटक केलय. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर अॅडल्ट स्टार प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिली आहे. यासह ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले माजी राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत ज्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जावे लागलेले ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या 30 पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप आहे. यातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्याचा आरोप आहे.























