एक्स्प्लोर
Ahmedabad plane crash : अहमदाबाद विमान दुर्घटना इंधन पुरवठा ठप्प झाल्यानं, दुर्घटनेचा अहवाल
गेल्या महिन्यात लंडनला जाणाऱ्या Air India विमानाला अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यावर अगदी काही मिनिटांतच भीषण अपघात झाला. या अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, Air India च्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहमदाबाद येथील विमानतळावरून उड्डाण केल्यावर विमानाच्या इंजिनांना इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारं जे स्विच असतं ते बंद केलं गेलं होतं. त्यामुळे उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच इंजिनमधील थ्रस्ट संपुष्टात आलं आणि विमान खाली कोसळलं. प्राथमिक अहवालातली माहिती समोर येतेय की, इंधन पुरवठाच बंद झाल्यामुळे हा विमान अपघात घडला. या अहवालाने अपघाताचे मूळ कारण स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे विमान सुरक्षिततेच्या नियमांवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पुढील तपास सुरू असून, या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















