अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांचा थेट अमेरिकेलाच अल्टिमेटम ABP Majha
आता बातमी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलेल्या अफगाणिस्तानातून... अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी आता थेट जगातील सर्वात मोठ्या शक्तिशाली अशा अमेरिकेलाच अल्टिमेटम दिलाय. ११ सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानची भूमी सोडण्याचा इशारा तालिबान्यांनी अमेरिकेला दिलाय. या घडीला अफगाणिस्तानात १० हजाराच्या जवळपास अमेरिकेचे जवान आहेत. सध्या अफगाणिस्तानातील काबूल विमानतळावर अमेरिकेचा ताबा आहे... आणि अमेरिकन वायुसेनेकडून देश सोडून जाऊ इच्छिणाऱ्या अफगाणी नागरिक, परदेशी नागरिक आणि अन्य देशांचे राजदूत आणि राजनैतिक अधिकाऱ्यांची सुटका केली जातेय. त्यामुळे आता तालिबाननं अमेरिकेला ११ सप्टेंबरचं अल्टिमेटम दिलंय.























