9/11 US Attack : 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण ABP Majha
9/11 US Attack : अमेरिकेच्या इतिहासात 11 सप्टेंबर ही तारीख कुणीही विसरु शकणार नाही. 11 सप्टेंबर 2001 साली अल कायदा या दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्यात ट्विन टॉवर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारती, ज्या अमेरिकेच्या वैभवाची साक्ष होत्या, त्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. त्यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. त्यावेळच्या एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेवर इतका मोठा हल्ला हा जगातील अनेक देशांच्या सुरक्षेची चिंता वाढवणारा होता.
या हल्ल्यानंतर अमेरिकेने जागतिक दहशतवादाविरोधात युद्ध पुकारलं आणि जगाच्या राजकारणाने वेगळं वळण घेतलं. 2011 साली त्यांनी या हल्ल्याला कारणीभूत असलेल्या लादेनला ठेचलं. अमेरिकेवर झालेल्या या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत.























