एक्स्प्लोर
Wardha : वर्ध्यात 23 जनावर लम्पी आजारामुळे दगावली, 55 जनावर आणखीही लम्पी आजाराने बाधीत
वर्धा जिल्ह्यात लम्पी आजाराने गेल्या पाच महिन्यांत २३ जनावरांचा मृत्यू झालाय. तर ५५ जनावरं लम्पीसोबत झुंज देत असून, त्यांच्यावर उपचार सुरूयेत. सध्या वाढत्या लम्पी आजाराला आटोक्यात आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झालेत. मात्र, वर्ध्यात लम्पी आजार काही आटोक्यात आला नाही. त्यामुळे कोटी रुपयांचा खर्च नेमका कुठे आणि कशावर झाला असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. एप्रिल २०२३ पासून आजपर्यंत २८९ जनावरे लम्पी आजाराने बाधित झाली होती. यातील २०८ जनावरे आजारातून बरी झालीये. तर २३ जनावरे दगावलीयेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल


















