US Election Result | तिसऱ्या दिवशीही राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालाचा पेच कायम, काय आहेत कारणं
US Elections Result: अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातील लढत चुरशीची झाली आहे. आता बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, मात्र ट्रम्प मतगणनेच्या विरोधात कोर्टात गेल्यानं अंतिम निकाल येण्यासाठी वेळ लागत आहे. दरम्यान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने दाखल केलेल्या मिशिगन आणि जॉर्जियामधील केसेस कोर्टाने फेटाळल्या आहेत. ट्रम्प यांनी या दोन्ही राज्यांमधील पोस्टल बॅलेट मतगणना थांबवण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी कोर्टाने फेटाळली आहे.
दुसरीकडे जो बायडन यांनी आपल्या समर्थकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी बायडन यांनी आवाहन केलं आहे.अमेरिकेत कायद्याची लढाई लढणं हे फार खर्चिक आहे. यासाठी जवळपास 75 कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. त्यामुळं ट्रम्प कोर्टात गेल्यानंतर बायडन यांच्या टीमनं तात्काळ 'बायडन फाईट फंड' स्थापन केला आहे. बायडन यांच्यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन या माध्यमातून केलं आहे.
जॉर्जियातील मुकाबल रोमांचक
जॉर्जियामध्ये ट्रंप आणि बायडन यांच्यातील मुकाबला रोमांचक झाला आहे. या ठिकाणी दोन्ही उमेदवारांची वोटिंग टक्केवारी समान झाली आहे. दोघांनाही या ठिकाणी 49.4 टक्के मतं मिळाली आहेत.
बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले
बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना 264 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, त्यांना विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे. दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात पोहोचले. मतगणनेत घोटाळ्याचा आरोप करत ट्रम्प समर्थकांनी एकीकडे गोंधळ घालायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये निकालाविरोधात केसेस करण्यात आल्या आहेत. यामुळं अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा अंतिम निकाल हाती यायला वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे जो बायडन यांनी आपल्या समर्थकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी बायडन यांनी आवाहन केलं आहे.