Thane Fake School : ठाण्यात 47 बोगस शाळा, 42 शाळा इंग्रजी माध्यमांच्या; प्रशासनाकडून कारवाईचे आदेश
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने 47 बोगस शाळांची यादीच जाहिर केलीये. तसंच या बोगस शाळांविरोधात दंडात्मक कारवाई करणार असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय .कळवा-मुंब्रा परिसरातही डझनभर शाळा बोगस असल्याचे समोर आलंय. ठाणे मनपा क्षेत्रात इंग्रजी माध्यमाच्या 42 , मराठी माध्यमाच्या 2 आणि हिंदी माध्यमाच्या ३ शाळा अनधिकृत आहेत. यासोबतच ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ग्रामीण भागात 37 अनधिकृत शाळांची देखील यादी जाहीर केली आहे. तसंच संबंधित संस्था चालकांनी या प्राथमिक शाळा तात्काळ बंद केल्याचं हमीपत्र प्राथमिक शिक्षण विभागास सादर करावं. असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी दिले आहेत.























