![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kapil Patil Angry on Polling Booth in Bhiwandi : डोळे फुटले का? भ@%#! कपिल पाटील कुणावर भडकले?
Bhiwandi Lok Sabha Election 2024 : भिवंडी शहरामध्ये सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदानात सायंकाळी काही ठिकाणी वादंग होत गालबोट लागले आहे. खंडूपाडा बाला कंपाउंड मिलत नगर येथील अल्पसंख्यांक बहुल असलेल्या या मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या आरोप करण्यात येत होता. परिणामी, भाजप उमेदवार कपिल पाटील (Kapil Patil) यांच्याकडे या संबंधित तक्रार गेल्यानंतर त्यांनी स्वतः या मतदान केंद्राला भेट दिली. त्यानंतर संतप्त कपिल पाटील यांनी निवडणूक अधिकारी तसेच उपस्थित पोलिसांना धारेवर धरत एकच गोंधळ घातला. यावेळी मतदान केंद्र परिसरात उभे असलेल्या नागरिकांच्या घोळक्याला बाहेर हाकलून लावण्याची मागणीही त्यांनी केली आणि मग स्वत:च पुढाकार घेत या मतदान केंद्रावरील गर्दी बाजूला केली
अनेक मतदान केंद्रावर बोगस मतदान- कपिल पाटील
परिसरातील अनेक मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी यावेळी कपिल पाटील यांनी केल्या आहे. तसेच काही ठिकाणी बोटावरील शाई पुसण्यासाठी केमिकल घेऊन बसल्याचे देखील दिसून आल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. लोकशाही वाचवायला निघालेलेच लोकशाहीची हत्या करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित प्रशासनाने वेळीच याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी केली आहे.
![Waris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/4fcb5af7941f8fc85999596d8b127595173189969563790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Kedar Dighe Thane : एकनाथ शिंदेंविरोधात कोपरी पाचपाखाडीतून केदार दिघे ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/23/015fe8f62f576b62e88c2909041e30ab1729656436562719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![PM Narendra Modi Thane Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेट्रोतून सफर; विद्यार्थ्यांशी संवाद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/05/28e5b2510aa4a1631887cb4a25321c6d1728136591847719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![PM Narendra Modi Thane Daura : पंतप्रधान मोदींच्यादौऱ्यासाठी ठाण्यात रस्त्याचं डीप क्लिनिंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/05/c961b1bf227a62b6601a0260e21cc3a9172810025539890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/02/d86d963edd8932026064be9eea66a360172789141802390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)