Durgadi Fort Kalyan: ईदनिमित्त कल्याण दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी मनाई,ठाकरे आणि शिंदे गटाचं आंदोलन
ठाणे : बकरी ईदनिमित्त हिंदू बांधवांना कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. याचा विरोध शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी 1986 साली सुरू केला होता. या नियमांचा विरोध म्हणून दिघे घंटा नाद करायचे. एकीकडे मुस्लीम बांधव नमाज पठण करतात तर दुसरीकडे हिंदू घंटा नाद करत देवीची आरती करतात. यावेळीदेखील शिवसैनिकांनी दुर्गाडी किल्ल्याच्या बाहेर घंटानाद करत आंदोलन केले.
दोन्ही गटाचे कार्यकर्ते आंदोलनासाठी उपस्थित
यावेळीदेखील दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवसनैकि जमले होते. विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेही काही कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे यांचे कार्यकर्ते एकमेकांत मिसळू नयेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे दोन्ही गट वेगळे ठेवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. या दोन्ही गटांनी दुर्गाडी किल्ला परिसरात काही काळ घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला होता.