Dombivli MIDC : डोंबिवली एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा रसायनयुक्त पाणी नाल्यात सोडलं
डोंबिवली एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा रसायनयुक्त पाणी नाल्यात सोडलं जात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एमआयडीसी फेज टूमधील हा प्रकार आहे . याआधी देखील काही कंपन्यांकडून अशा प्रकारे रसायनयुक्त पाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. पण त्याबाबत एमआयडीसीकडून ठोस कारवाई केली जात नसल्यामुळं पुन्हा पुन्हा तेच प्रकार सुरू राहतात. त्यात रसायनयुक्त पाणी नाल्यात सोडल्यामुळं या परिसरात उग्र दर्प पसरतो. त्यामुळं नागरिकांच्या आरोग्यला धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या भेडसावत असल्यामुळं एमआयडीसीनं तात्काळ चेंबर्स दुरुस्त करून घ्यावे. तसंच रसायनयुक्त पाणी थेट नाल्यात सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून करण्यात येत आहे.























