Solapur Ujani Dam Water Shortage : उजनीने गाठला तळ, सर्वसामान्यांना पाणीटंचाईची झळ ABP Majha
Ujni Dam Water Shortage : उजनीने गाठला तळ, सर्वसामान्यांना पाणीटंचाईची झळ ABP Majha
सूर्य आग ओकतोय. उन्हाच्या झळा रोज वाढतायंत. आणि त्याचवेळी पाण्यावाचून लोकांचा घसा कोरडा पडू लागलाय. अशी गंभीर परिस्थिती असताना नेते मंडळी मात्र राजकारणात दंग आहेत... हे कमी म्हणून की वचक नसल्याने प्रशासनही या समस्येकडे काणाडोळा करतंय. त्यामुळे राज्यातील पाणी समस्येकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. इतर बातम्यांपेक्षा आम्हाला ही बातमी जास्त महत्त्वाची वाटते... लोकं उष्माघाताने मरत आहेत... ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी दोन-दोन किलोमीटर पाय़पीट करावी लागतेय. पण जनतेचं सरकार अशी हाकाटी पिटणारे सरकार आणि प्रशासनानाल ही समस्या सोडवायला वेळ नाहीये. ही चार दृष्य प्रातिनिधीक आहेत...
कारण राज्यात बहुतेक ठिकाणी हे असंच चित्र आहे. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीमधून हजारो लिटर पाणी वाया जातंय. तर चिपळूणमध्येही धरणाला गळती लागलीय. कोकणात पाणीटंचाईच्या झळा आता तीव्र होऊ लागल्या आहेत आणि अशातच अशी गळती होत असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. तिकडे उजनी धरणाच्याही पाणीपातळीत घट झालीय. तसंच शहापूर तालुक्यातल्या १३६ गाव-पाड्यावर पाणीटंचाईचं संकट आल्याने गावकऱ्यांचे हाल होत आहेत.