(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur:मध्यरात्री दुचाकीवरुन ओढा ओलांडण्याचा प्रयत्न,कासेगावमध्ये ओढ्याच्या पाण्यात 3 जण गेले वाहून
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे ओढ्याच्या पाण्यात तीन जण वाहून गेल्याची घटना घडलीये. यामध्ये दोन जणांना बचावले असून त्यातला एक जण बेपत्ता आहे. ज्ञानेश्वर कदम असे पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचा शोध आता सुरु आहे, मध्यरात्री पाणी पुलावरून वाहत असताना तिघांनी दुचाकीवरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. पाण्याचा अंदाज न आल्यानं हे तीन जण ओढ्याच्या पाण्यात वाहून गेले,. मात्र आता या घटनेनंतर जास्त उंचीचा पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे ओढ्याच्या पाण्यात तिघे वाहून गेले, दोघे बचावले, एक जण बेपत्ता
पाण्याबरोबर वाहून जात असताना प्रवाहातील झाडांना पकडून दोघांना स्वतःला वाचविण्यात यश, तर एक जण अद्याप बेपत्ता
ज्ञानेश्वर कदम असे पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव, प्रशासनाकडून अद्याप शोध घेण्याचे काम सुरु
बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी हे दोघे बचवाले
सोलापुरात सुरु असलेल्या पावसामुळे कासेगाव ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आहे
मध्यरात्त्री पाणी पुलावरून वाहत असताना तिघांनी दुचाकीवरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला
यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे वाहून गेले