Praniti Shinde Ram Satpute : प्रणिती शिंदे की राम सातपुते?NCP-MNS कार्यकर्त्याची लाखाची पैज
Praniti Shinde Ram Satpute :
Solapur Loksabha : राज्यात चार टप्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. ज्या ठिकाणी मतदान झालंय, तेथील लोकांना, कार्यकर्त्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह इतका शिगेला पोहोचलाय की, कोण निवडून येणार याच्यावरुन पैजा लावण्यात येत आहेत. सोलापूर लोकसभेसाठी (Solapur Loksabha) तिसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. सोलापूर लोकसभेत (Solapur Loksabha) यंदाची लढत अतिशय चुरशीची मानली जात आहे.
मनसे आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये शर्यत
तिसऱ्या टप्यात मतदान झालेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक अत्यंत चूरशिची झाली आहे. त्यामुळे सोलापूरचा खासदार कोण होणार याच्या चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. राजकीय कार्यकर्ते देखील संभाव्य निकालची आकडेमोड करत आहेत. यातच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर आणि मनसेचे सोलापूर लोकसभा प्रमुख प्रशांत इंगळे यांच्यात एक लाखांची पैज लागली. त्यामुळे सोलापूरात कोण बाजी मारणार आणि पैजेचा पैसा कोणाच्या पदरी पडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महत्त्वाच्या बातम्या























