Sangola : Sharad Pawar - Devendra Fadnavis एकाच मंचावर येणार...सोलापुरातील कार्यक्रम नेमका काय?
सोलापूर जिल्ह्यातील सांगलीमध्ये आज शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यावेळी जयंत पाटीलही पवारांसोबत असतील. विशेेष म्हणजे पवार आणि फडणवीस १ ऑगस्टला पुण्यातील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर होते. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचं आज अनावरण होणारेय. याच अनावरणाच्या निमित्ताने हे दोघे नेते एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमासाठी शरद पवार सोलापूर येथून अडीच वाजता पोचणार आहेत . तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी सव्वा दोन वाजता सांगोल्यात येणार आहेत. त्यामुळे ते एकमेकांविषयी आणि बदलत्या राजकारणाविषयी काही भाष्य करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय























