Pandharpur : शासनाच्या विकास आराखाड्यात पंढरपूरच्या रहिवाशांनी सुचवले बदल, मसुदा तयार
पंढरपूरच्या विकासासाठी शिंदे फडणवीस सरकारने केलेल्या प्रस्तावित आराखड्याला नागरिकांनी केलेल्या टोकाच्या विरोधानंतर आता शासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी त्यांचा विकास आराखडा शासनाला सादर केला आहे . कोणत्याही शहराचा आराखडा नागरिकांच्या कडून घेण्याची हि बहुदा देशातील पहिलीच वेळ असून शहरातील तज्ञ अभियंते आणि नागरिकांनी एकत्र येत 15 दिवसात हा आराखडा तयार केला आहे . पुढच्या 50 ते 100 वर्षाचा विचार करून शासनाने चौफाळा ते महाद्वार घाट या मार्गावर कॉरिडॉर करण्याची घोषणा केली आणि यातूनच टोकाचा विरोध सुरु झाला होता . सध्या विठ्ठल मंदिर परिसरातील हा मार्ग केवळ 40 फूट रुंदीचा असून हा कॉरिडॉर मार्ग 400 फूट पर्यंत रुंद करण्याची तयारी शासनाने सुरु केल्यावर जनतेतून टोकाचा विरोध सुरु झाला होता . याशिवाय शासनाने पंढरपूर शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅन मधील 39 रस्त्यांच्या रुंदीकरणाची तयारी देखील केली आहे .























