(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange Solapur : मनोज जरांगेंच्या शांंतता रॅलीचा दुसरा टप्पा ; सोलापुरात जय्यत तयारी
Manoj Jarange Solapur : मनोज जरांगेंच्या शांंतता रॅलीचा दुसरा टप्पा ; सोलापुरात जय्यत तयारी
हेही वाचा
नाशिकचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय असणाऱ्या आमदारांचे विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election 2024) तिकीट कापले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने खोसकर यांचे काय होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. क्रॉस व्होटिंग प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा पुन्हा एकदा काँग्रेस आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचीही भेट घेऊन हिरामण खोसकर त्यांच्यासमोर आपली बाजू मांडणार आहेतय ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग (Cross Voting) केले त्यांची नावे उघड करा. विधानसभाचे तिकिट द्यायचे नसेल तर देऊ नका, मात्र आरोप करू नका, अशी बाणेदार भूमिका खोसकर यांनी घेतली आहे.
हिरामण खोसकर काय म्हणाले?
मी 100 टक्के क्रॉस व्होटिंग केलेले नाही. मी मिलिंद नार्वेकरांना मतदान केले होते. माझी पक्षाला विनंती आहे की, मी चुकलेले नाही, मी 100 टक्के पार्टीला मतदान केले आहे. मी आजही काँग्रेससोबत आहेत, उद्याही पक्षासोबत आहे. काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे. मी बाळासाहेब थोरात साहेबांना सगळी वस्तुस्थिती सांगितली. साहेब तुम्ही आम्हा 7 लोकांना मिलिंद नार्वेकर यांना मतदान करायला सांगितलं, त्या पद्धतीने आम्ही रुममध्ये जाऊन मतदान केले. आता मुंबईत जाऊन नाना पटोले यांची भेट घेणार आहे. ते वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्यासमोर काय बोलणार? पण मी त्यांच्यासमोर पुन्हा एकदा माझी बाजू मांडणार आहे, असे हिरामण खोसकर यांनी सांगितले.