Anganewadi Bharadi Devi : आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा काही तासांवर, यात्रेची जोरदार तयारी
कोकणातल्या लाखो भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा अवघ्या काही तासांवर आली आहे. आंगणेवाडीच्या भराडीदेवीचा उत्सव उद्या साजरा होणार आहे. मसुरे गावच्या आंगणेवाडीतली भराडीदेवी ही मूळची केवळ आंगणे कुटुंबीयांची देवी आहे. 'आंगणे कुटुंबीयांचं खाजगी मंदिर' असा फलकही भराडीदेवीच्या मंदिराबाहेर लावण्यात आला आहे. पण भाविकांची या देवीवरची श्रद्धाच इतकी मोठी आहे की, देवीचं मंदिर दर्शनासाठी सर्वांना खुलं असतं. त्यामुळं सर्वसामान्य भाविकांसह राज्यातील बडी राजकीय नेतेमंडळीही वर्षानुवर्षे भराडीदेवीच्या दर्शनासाठी धाव घेतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सहकारी उद्या भराडीदेवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. पाहूयात आमचा प्रतिनिधी सदाशिव लाडनं घेतलेला आढावा.






















