एक्स्प्लोर
Sindhudurga Bus Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरची 5 महिलांना धडक, एकीचा मृत्यू
कुडाळहून मालवणच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने काळसे येथे शेतातून काम करून घरी परतत असलेल्या पाच महिलांना धडक दिली. या धडकेत डंपरखाली सापडून रुक्मिणी काळसेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने बेदरकारपणे डंपर चालवून धडक दिल्याने या सर्व महिला अक्षरश: फुटबॉलप्रमाणे उडाल्या. चौघाना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मालवण पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. तर डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना काल सायंकाळी ७ वाजताची आहे.
आणखी पाहा























