Sangli Krishna River Pollution : कृष्णेतील प्रदूषणप्रकरणी वसंतदादा साखर कारखान्यावर कारवाई
आता एक मोठी बातमी सांगलीतून... ही बातमी म्हणजे एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट आहे...प्रदूषण मंडळाने कृष्णा नदीतील प्रदूषण प्रकरणी वसंतदादा साखर कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत..2 दिवसांपूर्वी कृष्णेत प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत पावले..कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा एबीपी माझाने लावून धरल्यानंतर प्रदूषण मंडळाने कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली....आणि कृष्णेत मळीमिश्रीत पाणी सोडणाऱ्या कारखान्यांपैकी वसंतदादा साखर कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.. तसंच २४ तासांत कारखान्याचे वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यास सांगून पुढील आदेशापर्यंत कारखाना बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आलेत..कारखान्याचे मळीमिश्रित पाणी शेरी नाल्याद्वारे कृष्णेत मिसळत असल्याने प्रदूषण मंडळाने कारवाईचे आदेश जारी केलेत.























