Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे, नद्यांना पूर
Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे, नद्यांना पूर
सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी ओढे, नद्यांना पूर, रस्त्यांवर पाणीच पाणी.
तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना काल सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदी पुन्हा दुधडी भरून वाहू लागली तर या भागातील द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचले. ढगफुटीसदृश पावसाने तासगाव तालुक्यातील बस्तवडे, खुजगाव, सावळज, वायफळे, वाघापूर, वज्रचौंडे, मणेराजुरीसह परिसरातील ओढे, नाल्यांना पूर आल्याचे चित्र होते.तासगाव पूर्व भागातील सावळज, मणेराजुरी, सावर्डे, वाघापूर, वज्रचौंडे, बस्तवडे, बलगवडे, खुजगाव, आरवडे, जरंडी, सिद्धेवाडी, दहिवडी, डोंगरसोनी, वायफळे, बिरणवाडी, अंजनी, गव्हाण या परिसरात मुसळधार पाऊस झाला. सावळसह परिसरातील गावात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे ओढे, नाल्यांना पूर आला. अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. त्यामुळे बस्तवडे, खुजगाव, सावळज, वायफळे, मणेराजुरी परिसरात अनेक ठिकाणी काल उशिरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.