Sangli APMC Election : सांगलीतील तीन बाजार समित्यांची आज मतमोजणी
Sangli APMC Election : सांगलीतील तीन बाजार समित्यांची आज मतमोजणी
सांगली जिल्ह्यातल्या सांगली, इस्लामपूर आणि विटा कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी आज होणार आहे..((सांगली बाजार समितीसाठी 93. 45 टक्के तर इस्लामपूर बाजार समिती साठी 86. 57 टक्के आणि विटा बाजार समितीसाठी 91 : 30 टक्के इतके मतदान झालेय..तिन्ही बाजार समितीत चुरशीने मतदान झालेले आहे.यामुळे सर्वच पक्षातील गटाची धाकधूक वाढलीय. ))सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशा पॅनलमध्ये थेट लढत झालीय .तर इस्लामपूर बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सर्व पक्षनी एकत्रित येऊन निवडणूक लढवली तर विटा बाजार समितीत स्थानिक काँग्रेस,भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली आणि या युती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र पॅनल उभे केले होते. आता यामध्ये कुणाची सत्ता बाजार समितीत राहणार हे आज स्पष्ट होईल.























