एक्स्प्लोर
Ratnagiri Sangameshwar : संगमेश्वरमधील अंत्रावलीत सामूहिक नांगरणी स्पर्धा, ग्रामस्थांनी लुटला आनंद
Ratnagiri Sangameshwar : संगमेश्वरमधील अंत्रावलीत सामूहिक नांगरणी स्पर्धा, ग्रामस्थांनी लुटला आनंद
रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील अंत्रावली गावात नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातल्या 50 हून अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या. सध्याच्या घडीला सामूहिक शेती कालबाह्य होताना दिसून येत आहे. शिवाय नोकरी - धंदा निमित्त शहरांमध्ये गेलेला तरुण हळूहळू शेतीपासून लांब जात आहे. दरम्यान शेतीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. मुख्य गोष्ट म्हणजे ही स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील रहिवाशी देखील मोठ्या संख्येने हजर राहिले.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















