Barsu Refinery Maharashtra : काताळशिल्पांना हात न लावता उभारणार रिफायनरी, सरकारकडून स्पष्ट
बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीच्या ठिकाणी 62 कातळशिल्पांची नोंद असून, त्यांना वगळून रिफायनरी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कातळशिल्पांसह रत्नागिरीतील १७ ठिकाणच्या कातळशिल्पांचे जतन संवर्धन करण्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी प्रश्नोत्तरात दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीविरोधात आंदोलन सुरू आहे.
या ठिकाणी १७० कातळशिल्प असून, त्यांना रिफायनरीमुळे धोका निर्माण झाला असल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याविषयी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. याविषयी स्पष्टीकरण देताना मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.























