Rajendra Pawar On Supriya Sule: सुनेत्रा पवारांच्या पराभवावर राजेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Rajendra Pawar On Supriya Sule: सुनेत्रा पवारांच्या पराभवावर राजेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ
हे देखील वाचा
मोठी बातमी : मला उपमुख्यमंत्रिपदावरून मुक्त करा, देवेंद्र फडणवीसांची भाजप नेतृत्त्वाला विनंती
Devendra Fadnavis News : आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे, मला सरकारमधून मोकळं करावे (Deputy Chief Minister of Maharashtra) अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी (Vidhansabha Election ) पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विनंती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते मुंबईमध्ये बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवले. एनडीएला 19 जागांवरच समाधान मानावे लागले. 2019 च्या निवडणुकीत 22 जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला फक्त 9 जागांवर विजय मिळवता आला. लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही, याची कबुली दिली. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाची कारणेही सांगितली.