Uddhav Thackeray full Raigad Poladpur : स्वप्नातले पालकमंत्री,नॅपकिन घामाने भिजले पण मंत्रीपद मिळेना
Uddhav Thackeray On Bharat Gogawale : रत्नागिरी : मला मुख्यमंत्रीपदाचा (Chief Minister) मोह नाही, जबाबदारी आली म्हणून पार पाडली, असं वक्तव्य ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोकण दौऱ्यावर असताना केलं आहे. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटाला (Shinde Group) टोलाही लगावला आहे. तुमच्या वडिलांचा फोटो लावून मतं मागा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खडसावलं आहे. तसेच, उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सणसणीत टोला लगावला आहे. स्वप्नातील पालकमंत्री, नॅपकिन घामाने भिजले पण मंत्रीपद मिळत नाही. झेंडे सोडून नॅपकिन फिरवतात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता सणसणीत टोला लगावला आहे.























