Chandrakant Patil : उद्या चंद्रकांत पाटील राज ठाकरेंना भेटणार, मुंबई महापालिकेत भाजप-मनसेची युती?
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होण्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज यांच्या निवासस्थानी म्हणजे कृष्णकुंजवर उद्या सकाळी साडेअकरा वाजता दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे. फक्त त्यांनी व्यापक भूमिका घ्यावी असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी परप्रांतियांबद्दल केलेलं भाषणही चंद्रकांतदादांनी ऐकलंय. त्यामुळं उद्याच्या बैठकीत त्यांच्यामध्ये भाजप आणि मनसे युतीबाबत चर्चा होणार का हे पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या























