Vijay Shivtare on Ajit Pawar : शिवतारे लोकसभा लढणार की माघार घेणार? मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली?
Vijay Shivtare on Ajit Pawar : शिवतारे लोकसभा लढणार की माघार घेणार? मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली?
मुंबई: आपण महायुतीत आहोत, त्यामुळे युतीधर्म पाळावाच लागेल. अजितत पवार हे त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या पराभावाचे धनी नको व्हायला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचा दावा विजय शिवतारे यांनी केला. आपली भूमिका एक दोन दिवसात जाहीर करू असंही ते म्हणाले. बारामतीच्या उमेदवारीवरून विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील दावा केला.
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना बारामतीतील गणितं समजावून सांगितली, त्यामुळे निश्चितपणे चांगला रिझल्ट येईल. एवढंही सांगितलं की अजित पवार निवडून येणार नाहीत. मी जरी उमेदवार नसलो तरी अजित पवारांचा पराभव होईल. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, बारामतीच्या निवडणुकीवरून आपण युतीधर्म पाळला पाहिजे, आपण युतीमध्ये आहोत. त्यांचं जे काही होईल ते आपसात होईल, त्यामध्ये आपण पडायला नको. ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल, आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला असं मुख्यमंत्री म्हणाले.