Sushma Andhare On Indrayani River Accident : इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
Sushma Andhare On Indrayani River Accident : इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
पुणे : मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला आहे. त्यामध्ये अनेक पर्यंटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील मावळमध्ये कुंड मळ्यात पूल कोसळल्याने काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना रविवारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलिस दाखल झाले आहेत. कुंडमळा ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे. हाच पूल कोसळला आहे.






















