Raj Thackeray Pune : राज ठाकरे यांच्या हस्ते आज खालकर चौकातील हनुमान मंदिरात महाआरती
Raj Thackeray in pune : मशिदीवरील भोंगे न हटवल्यास हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा देणारे राज ठाकरे येत्या हनुमान जयंतीला काय करणार याच्या चर्चा होत्या. आज हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे पुण्यात कालच पोहोचले आहेत. पुण्यातील खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते ही महाआरती होणार आहे. एका अर्थी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधी आंदोलनाचा हा श्रीगणेशा असल्याचंच राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. आधी मुंबई, नंतर ठाणे आणि आता पुण्यात राजगर्जना होणार आहे. दरम्यान जे पोस्टर मनसेनं बनवलं आहे त्यावर राज ठाकरे यांचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख करण्यात आला आहे.























