Sharad Mohol Death : कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या, नेमकं काय घडलं हत्येठिकाणी?
पुणे शहरात गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. कुख्यात गुंड शरद मोहोळची आज भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आर्थिक वाद आणि जमिनीच्या वादातून मोहोळची हत्या झाल्याचं प्रर्थामिक चौकशीत समोर आलं आहे. कोथरुडच्या सुतारदरा परिसरात मोहोळवर आज दुपारी दीड वाजता हल्ला झाला. तीन हल्लेखोर बाईकवरून आले होते. शरद कधी घराबाहेर पडतोय याची ते वाटच पाहत होते. शरद जसा घाराबाहेर पडला तशाच त्याच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. हल्ल्यात शरद गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं ससून रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र दोन तासांनी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मोहोळवर हल्ला करणाऱ्या ३ आरोपींपैकी एका आरोपीचं नाव समोर आलंय.. संतोष पोळेकर असं आरोपीचं नाव आहे.. दरम्यान हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरणासारखे अतिशय गंभीर गुन्हे शरद मोहोळवर दाखल होते. मोहोळच्या हत्येनिमित्तानं पुण्यात पुन्हा मोठं गँगवॉर सुरू झालंय की काय, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारतायेत.