Pune swargate Bus Stand:पुण्यात स्वारगेट बस स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी,तिकीटांच्या किंमतीत वाढ
दिवाळीनिमित्त अनेक जण आपापल्या गावाकडे निघालेत.. मात्र पुणेकरांना गावाकडे जाण्यासाठी एसटीची तासनतास वाट पाहावी लागतेय.. स्वारगेट बस स्थानकात प्रवासी सकाळपासून ताटकळत बसलेत.. एसटी उशिरा धावत असल्याने प्रवाशांचा खोळंबा झालाय.. काल रात्री शिवाजीनगर बस स्थानकावरही प्रवाशांचा गोधळ निर्माण झाला होता.. एसटी बस उपलब्ध न झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. एसटी बसचं नियोजन तसंच वेळापत्रक कोलमडल्याने गाड्या २ ते ३ तास उशिराने धावत होत्या. आज सकाळपासूनही पुण्यात एसटीचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे.. या संदर्भात स्वारगेट इथल्या कर्मचाऱ्यांना विचारलं असता त्यांच्याकडून उत्तरं देण्यास टाळाटाळ करण्यात येतेय..























