(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Porsche Car Accident : अल्पवयीन आरोपीला पिझ्झा खायला देण्यात आला : शंकर संगम
पुण्याच्या कल्याणीनगरमधील रॅश ड्रायव्हिंगप्रकरणातील अल्पवयीन आरोपीला येरवडा पोलीस ठाण्यात पिझ्झा खायला देण्यात आला होता, असा दावा शिवसेनेच्या शिंदे गटाचे पुणे शहर समन्वयक शंकर संगम यांनी केलाय. हा अपघात झाल्यावर रविवारी येरवडा पोलिस ठाण्यात शंकर संगम शिष्टमंडळासह निवेदन देण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी आरोपीसाठी पिझ्झाचे बॉक्स नेताना पाहिले, असं शंकर संगम म्हणालेत, त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी...
Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल याला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तसेच सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आता पुणे सत्र न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.