Pune Lockdown : पुण्यात सध्यातरी लॉकडाऊनची गरज नाही : महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे : पुण्यासारख्या रुग्ण संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. हायकोर्टाच्या सूचनेनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत कडक लॉकडाऊनबाबत निर्णय होणार का असा प्रश्न आहे. मात्र सध्यातरी पुण्यात आहे त्यापेक्षा कडक लॉकडाऊनची आवश्यकता नाही, असं मत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलं आहे. 'एबीपी माझा'शी त्यांनी संवाद साधला.#
महापौर म्हणाले की, "हायकोर्टात जी माहिती सादर केली जाते त्यानुसार कोर्ट मत मांडतं. मुळात हायकोर्टात सादर केलेली माहिती,आकडेवारी कधीची आहे? राज्य सरकराच्या आकडेवारीत विसंगती पाहायला मिळत आहे. सध्या पुणे शहराची परिस्थिती अत्यंत चांगली आहे, नियंत्रणात आहे. मागील 15 दिवसात अॅक्टिव रुग्णांची संख्या 16 हजाराने घटली आहे."