(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Drugs Case in Vidhan Parishad : Lalit Patil वरुन विरोधकांचे धारदार प्रश्न, फडणवीसांना घेरलं
नागपूर : ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणाची आज सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे सचिव सचिन अहिर (Sachin Ahir), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) ते अनिल परब (Anil Parab) या ठाकरेंच्या तीन आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेरलं आहे. ललित पाटीलची नार्को टेस्ट करा अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहीर यांनी केली. तर शाळा कॉलेजांबाहेर सर्रास ड्रग्ज विकली जातायत. तसंच हुक्कापार्लर हे ड्रग्जचे अवैध अड्डे बनलायला लागली आहेत असा आरोप केला. तर अवैध हुक्कापार्लरवर कारवाई सुरू असून शाळा कॉलेजेस जवळच्या हजारो पानटपऱ्या पाडल्याची माहिती दिली. तसंच राज्यात अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन झाल्याची माहिती दिली.
ललित पाटील प्रकरणं म्हणजे आंतरराष्ट्रीय ड्रगज रॅकेट आहे. गृहमंत्री यांच्यासमोर मोठा टास्क आहे. कारण ललित पाटील स्वतः म्हणाला आहे की मी पळून गेलो नाही मला पळून लावलं तरी अजूनही संजीव ठाकूरला अटक झालेली नाही तसेच बाकी अरोपी यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सचिन अहिरांनी केली आहे.