Sanjay Gaikwad: साऊथ इंडियन लोकांनी डान्सबार, लेडीज बारने महाराष्ट्र नासवला, विरोधकांना त्यांचा पुळका कशाला; संजय गायकवाडांचा अजब युक्तिवाद
Sanjay Gaikwad punches canteen manager: संजय गायकवाड यांच्या जेवणात शिळं वरण देण्यात आलं होतं, या वरणाला वास येत होता. त्यामुळे गायकवाडांनी कँटिनच्या मॅनेजरला मारलं होतं

MLA Sanjay Gaikwad: आकाशवाणी आमदार निवासात शिळे जेवण दिल्याने कँटिनच्या व्यवस्थापकाला बेदम मारहाण करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आपल्याला संबंधित कृतीचा कोणताही पश्चाताप नसल्याचे वक्तव्य केले आहे. मी मारहाण केल्यामुळेच अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) लोकांना निकृष्ट अन्न देणाऱ्या कँटिनचा परवाना रद्द केला. माझा मार्ग चुकीचा असेल पण मी जे काही केलं, माझी जी प्रतिक्रिया होती, ती चूक नव्हती, असा युक्तिवाद संजय गायकवाड यांनी केला. तसेच आमदार निवासातील कँटिनचा मालक दाक्षिणात्य असून विरोधकांना त्याचा एवढा पुळका का आला आहे, असा सवालही संजय गायकवाड यांनी उपस्थित केला.
मारहाणीवरुन माझ्यावर विरोधक टीका करतात. मला त्यांना विचारायंच आहे की, महाराष्ट्रा साऊथच्या लोकांनी नासवला. सगळ्या लेडीजबार, डान्सबारने तरुणाई बरबाद केली, महाराष्ट्राची संस्कृती खराब केली. मी जे केलं ते महाराष्ट्रातील लोकांसाठी केलं, मग तुम्हाला साऊथ इंडियन लोकांचा पुळका येण्याची गरज काय, असा सवाल संजय गायकवाड यांनी विरोधकांना विचारला.
मला स्पष्ट करायचे आहे की, मी ज्याला मारहाण केली तो वेटर नव्हता तर कँटिनचा व्यवस्थापक होता. कँटिनच्या मालकाने त्याला सस्पेंड केले आहे. या कँटिनविरोधात गेल्या पाच वर्षांत 400 तक्रारी आल्या, पण कोणतीही कारवाई झाली नाही. नरहरी झिरवळ साहेबांनी सांगितलं मी कारवाई करायला सांगितली, पण दोन महिने झाले मलाच अहवाल येत नाही. या सगळ्यात कोणाचं साटेलोटं होतं? कँटिनमध्ये लोक पाच-दहा हजार लोक जेवतात, त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरु होता. मला गेली 20 वर्षे पोटाचा त्रास आहे. मी वेडवाकडं खाल्लं, तर 15 दिवस त्रास होतो. त्यामुळे मी बाहेर जेवत नाही. कँटिनमध्ये विषारी जेवण देत असतील तर मला परत त्रास होतो. त्यामुळे माझी प्रतिक्रिया चूक नाही. माझा मार्ग चुकीचा होता, पण मला हे कराव लागलं. त्यामुळे एफडीएला कारवाई करावी लागली. माझ्या कृतीमुळे लाखो लोकांचे आरोग्य वाचणार आहे, असे संजय गायकवाड यांनी सांगितले.
Sanjay Gaikwad: माझा गुन्हा मोठा नाही, छोटीशी मारहाण, कायद्यात शिक्षेची तरतूद नाही: संजय गायकवाड
यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण ही फार मोठी गोष्ट नसल्याचा दावा केला. मी केलं ते छोटीशी मारहाण होती. मला कायदे माहिती आहेत, हा एनसी मॅटर आहे. त्यासाठी कायद्यानुसार शिक्षेची तरतूद नाही. अधिवेशन सुरु असल्याने मी विधानसभा अध्यक्षांना भेटलो. मी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून माझी बाजू मांडणार आहे. माझी कृती चूक वाटत असेल तर मी मुख्यमंत्री देतील त्या शिक्षेसाठी तयार असल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले.
आणखी वाचा
























