Pune Covid Jumbo Hospital | वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील जंबो कोविड सेंटरच्या उभारणीला उशीर
पुण्याने कोरोना रुग्णांच्या बाबतीत मुंबईलाही मागं टाकलंय आणि कोरोनाच्या सध्याच्या रुग्णांच्या बाबतीत तर पुण्याने संपूर्ण देशात आघाडी घेतली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही सातत्याने वाढतोय. मात्र एवढी गंभीर परिस्थिती असताना पुण्यातील दोन जंबो हॉस्पिटल्स वेळेत सुरु होतील अशी चिन्हे नाहीत. ही जंबो हॉस्पिटल्स 19 ऑगस्टला सुरू होतील असं सांगण्यात आलं होतं, परंतु पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरची सध्याची परिस्थिती पाहता आणखी काही दिवस त्यासाठी लागणार आहेत असं दिसतंय. सध्या पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर एक आणि पिंपरी चिंचवडच्या अण्णासाहेब मगर मैदानावर एक अशा दोन जंबो हॉस्पिटलचं काम सुरु आहे. त्यासाठी दिल्लीतील एका कंपनीला कंत्राट देण्यात आलंय तर आवश्यक ती मदत PMRDA करणार आहे.























