(Source: ECI / CVoter)
Pune Crime News : पुण्यात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Pune Crime News : पुण्यात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
पुण्यात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ४ ही आरोपी मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांचे कोणाशी तरी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर या ४ ही जणांनी मिळून त्या व्यक्तींना शोधण्यासाठी उत्तमनगर भागातील कोंढवे धावडे परिसरात या ठिकाणी आले. या परिसरात येताच त्यांनी त्यांच्या जवळील कोयते काढले आणि दुचाकीवरून परिसरात दहशत माजवली. "आम्ही या एरिया मधील भाई आहोत, कोणी आमच्या मध्ये आलं तर खाल्ल्यास करून टाकू" असे म्हणत त्यांनी नागरिकांवर कोयते उगारले. दरम्यान, त्यांनी या ठिकाणी असलेल्या एका दुकानातील फ्रिजवर पडलेला पेव्हर ब्लॉक मारला. या घटनेमुळे परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता. काही वेळ गोंधळ घातल्यानंतर या ४ जणांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद घेऊन या सगळ्यांना अटक केली आहे.