Pune Crime : लग्न मोडायला गेला अन् गजाआड झाला ; पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिष Raghunath Yemul यांना अटक
उद्योजकाला अघोरी सल्ला देऊन लग्न मोडायला भाग पाडल्याचा आरोप असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ राजाराम येमुल यांना पोलिसांनी अटक केलीय. 27 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केलीय. फिर्यादी महिलेच्या पतीनं तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केले आणि ठार मारण्याचा प्रयत्नही केला होता असा आरोप आहे. ज्योतिषी रघुनाथ येमुल यांनी फिर्यादी महिलेचा संसार मोडण्यासाठी अनिष्ट व अघोरी त्याचा वापर केला आहे. तसेच तिचा संसार मोडण्यासाठी त्यांच्या बेडरूम बाहेर हळदी कुंकू लावलेल्या आणि टाचण्या मारलेला लिंबू ठेवण्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या सर्व तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी रघुनाथ येमुल यांना अटक केली आहे.























